.
अनेक अनाथ, एड्सबाधित, निराधार, तृतीयपंथी, बेवारस, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’
२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. व अनाथ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले..
कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे.. मानसशास्त्रमध्ये मध्ये पदवी घेतलेल्या गुंजनने स्पर्धा परीक्षेची तयारी 11 वी पासूनच सुरु केली होती. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. अनेक स्पर्धा परीक्षा तिने दिल्या तसेच SSB च्या मुलाखती सुद्धा दिल्यात. त्यानंतर तिने स्टाफ सिलेक्शन कमिशन पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवलं. शिक्षण घेत असताना सुध्दा अनेक खाजगी नोकऱ्या पण तिने केल्या..
दिवसरात्र मेहनत करून सुद्धा गुंजनने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला..व त्यावेळी करत असलेल्या नोकरीचा सुध्दा राजीनामा दिला...! आश्चर्य वाटलं ना?
पण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता.
एके दिवशी अमरावतीच्या राजकमल चौकात गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!
ते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!
आता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. स्वतःच्या घरी निराधार लोकांचा ती संभाळ करते, अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. वर्षभर खेडोपाडी जाऊन एड्स विषयावर लोकांची जनजागृती करते...स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.
संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का? याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते.
अमरावती मध्ये गुंजन अनेक निराधार, व एड्सबाधित लोकांना आपल्या घरी सांभाळते, त्यांची सुश्रुशा करते. त्यांना रोजगार मिळावा म्हणून अनेक व्यवसाय शिक्षण पण देते.. व या सर्व उपक्रमात तीला कुठल्याही सरकारी यंत्रणेची मदत मिळत नाही, स्वतः च्या पैश्यातून व लोकसहभागातून कार्य करते...
अमरावती मध्ये रस्त्यावरील बेवारस मृतदेहांचा अंतिम विधी सुद्धा गुंजन स्वतःच्या पैश्यातून करते...
देशाबाहेर जाऊन सुद्धा गुंजन नी निस्वार्थ सेवा दिली आहे.. नेपाळ च्या भूकंप मध्ये अमरावती हुन एकटीने जाऊन तिथे सेवाकार्य केले आहे.. केदारनाथ व जम्मूकाश्मीर च्या आपदे मध्ये सुद्धा तिने आपले विशेष सहकार्य केले आहे व तेही कित्येक दिवस व निस्वार्थीपणे...
गुंजनने अमरावतीत गाविलगड़ ढोल पथक सुरु केले या पथकात आज जवळपास 100 वादक आहेत. पुणे,मुंबई वगळता अख्या महाराष्ट्रमधील व विदर्भातील ती पहिली महिला पथकप्रमुख आहे हे विशेष... व पथकामार्फत आलेला सर्व निधी ती सामाजिक कार्यात लावते व गरजवंत लोकांना मदत करते...
आजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण,एड्सबाधित,निराधार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमरावती मध्ये गुंजनने निराधार , बेवारस व एड्सबाधित लोकांसाठी "गोकुळ" हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे, यासाठी ती कुठलिही ही सरकारी मदत स्वीकारत नाही... स्वतः दोघे नवरा बायको जे कमावतात त्यातून व लोकसहभागातून ते प्रकल्प चालवतात... गोकुळ मध्ये रस्त्यावरील निराधार, बेवारस वृद्ध तसेच एड्सबाधित महिला व लहान मुलं-मुली आहेत...
एड्सबाधित महिलांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून त्यांच्यासाठी लघुउद्योग सुरू केले आहेत, यामध्ये गोमूत्रपासून फिनाईल, हाताने व मशिनने बनवलेल्या गोधड्या/ रजई, धुपबत्ती इत्यादी प्रोडक्ट बनवतात..त्यातून स्त्रियांना रोजगार तर मिळतोच शिवाय जगण्याची नवी उमेदही प्राप्त होते...
तृतीयपंथी यांना सुद्धा समाजात समान हक्क व स्थान मिळावे यासाठी गुंजन सदैव तत्पर असते. त्यांना रोजगार मिळावा तसेच त्यांच्याबद्द्ल समाजात असलेला चुकीचा समज दूर व्हावा यासाठी ती समाज व तृतीयपंथी यांमधील दुवा झाली आहे. तिच्या सेवा कार्यात अनेक तृतीयपंथी पण तिला आता मदत करतात हे विशेष..
गुंजनची आणखी एक विशेष बाब म्हणजे ती कधीही नवीन कपडे विकत घेत नाही लग्नाच्या वेळी घेतलेल्या 5 साड्या ही तिची शेवटची शॉपिंग, त्यानंतर आयुष्यात कधी नवीन कपडे विकत घेणार नाही हे तिने व्रत घेतले आहे.. चक्क लग्नानंतरच्या सर्व सणासुदीला सुध्दा तिने कपडे विकत घेतले नाहीत..लोकांनी दिलेले कपडे ती घालते..
गुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे! कश्मीर येथील केंद्र सरकारच्या संस्थेमधून गिर्यारोहणाचे कोर्स तीने केले आहेत.. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत अनेकवेळा तिने हे शिखर सर केले आहे. हिमालयात ट्रेकिंग चा अनुभव तिला आहे..
गुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या
मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही. मात्र आजवर तिला शेकडो पुरस्कार भेटले आहेत...
५०० एड्सबाधित मुलं दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही एड्सबाधित , निराधार, मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते.
तिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गेल्यावर्षी पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला तपोवन संस्थेचा 'द रिअल हिरो', ‘हिरकणी अवॉर्ड, राज्यस्तरीय 'भीमरत्न पुरस्कार' 'वुमन्स अचिव्हर अवॉर्ड', लोकमत पेपर चा सामाजिक क्षेत्रातील 'सखी सन्मान पुरस्कार', सकाळ पेपर चा 'यूथ इन्स्पिरेटर अवॉर्ड', तसेच दोनवेळा अमरावती महानगरपालिकाचा सामाजिक क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारने व इतर अनेक पुरस्काराने नेहमीच गौरवण्यात येत आले आहे.
गुंजनने राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. NCC मध्ये तिला राष्ट्रीय कलरकोट आहे.. क्रीडा स्पर्धेत तब्बल 10 वर्षे अनेक स्पर्धा तिने गाजवल्या आहेत.. ती उत्कृष्ट लिखाण करते.. कला,क्रीडा,साहित्य, सर्व क्षेत्रात ती अग्रेसर आहे.
एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला मन:पूर्वक शुभेच्छा !
गुंजन गोळे हिच्याशी संपर्क साधायचा असल्यास 8379858765
9923444461
Story By
वैशाली देवकर
मुंबई

No comments:
Post a Comment